सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गास्वरूपिणि ।

संस्कृत श्लोक

नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गास्वरूपिणि ।

कैवल्यवासिनि देवि श्री शान्तादुर्गे नमोऽस्तु ते ।।

अर्थ (Meaning)

हे दुर्गे, महादुर्गे,नवदुर्गास्वरूप देवी तुला नमस्कार असो. आत्मस्वरूपात स्थित असणार्‍या हे श्री शान्तादुर्गे, तुला माझा नमस्कार असो.

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः

संस्कृत श्लोक

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः

स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।

दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या

सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ।।

अर्थ (Meaning)

हे दुर्गादेवी, जो तुझे भक्तीपूर्वक स्मरण करेल त्याचे संसारभय तू दूर करतेस. जो तुझे ध्यान करतो त्याला तू कल्याणकारक बुद्धी प्रदान करतेस. आमच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि भय दूर करणार्‍या हे देवी, तुझ्याशिवाय असे कोण आहे, ज्याचे हृदय आपल्या भक्तांवर सर्व प्रकारचे उपकार करण्यासाठी नेहमी दयार्द्र असते ?

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

संस्कृत श्लोक

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक २४

अर्थ (Meaning)

हे सर्वस्वरूपे, सर्वेश्वरी (सर्वांची स्वामिनी) आणि सर्व शक्तिशालिनी अशा दिव्यरूपिणी दुर्गे देवी, तू आमचे (दैत्यादी दुष्ट शक्तींच्या) भयांपासून रक्षण कर. तुला माझा नमस्कार असो.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

संस्कृत श्लोक

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक १०

अर्थ (Meaning)

सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (श्री दुर्गादेवी), मी तुला नमस्कार करतो.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)