सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

अतसीपुष्पसङ्का‌शां रत्नभूषणभूषिताम्।

संस्कृत श्लोक

अतसीपुष्पसङ्का‌शां रत्नभूषणभूषिताम्।

शङ्खचक्रगदापद्मशार्ङ्गबाणधरां करैः ।।

षड्भिः कराभ्यां देवेशीं वरदाभयशोभिताम्।

एवमष्टभुजां ध्यायेत्‌ सर्वसाम्राज्यसिद्धये ॥

–इतर  •  इतर

अर्थ (Meaning)

अर्थ : अळशीच्या फुलांप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या, रत्नजडीत अलंकारांनी सुशोभित, सहा हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य आणि बाण धारण केलेल्या हे देवी, तू वर देणाऱ्या अन्‌ अभय देणाऱ्या मुद्रांनी शोभून दिसतेस. सर्व साम्राज्याच्या प्राप्तीसाठी हे अष्टभुजा, मी तुझे पूजन करतो.

अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये

स्तोत्र

अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये

गुणगणवारिधि लोकहितैषिणि स्वरसप्तभूषित गाननुते ।

सकलसुरासुरदेवमुनीश्वर मानववन्दितपादयुते

जयजय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मि त्वं पालय माम् ।।


अर्थ (Meaning)

सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) जिचे वाहन आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारे जिचा महिमा अधिकच वाढतो, जी विविध गुणांचा सागर आहे, जी सर्वसामान्य जनांचे हित करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य जिची पूजा करतात, अशा भगवान मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय असो. तू माझे रक्षण कर.

शिवो भुत्वा शिवं यजेत् ।

संस्कृत श्लोक

शिवो भुत्वा शिवं यजेत् ।

अर्थ (Meaning)

शिवस्वरूप होऊनच शिवाची पूजा करावी.

प्रज्ञानं ब्रह्म ।

संस्कृत श्लोक

प्रज्ञानं ब्रह्म ।

अर्थ (Meaning)

ज्ञान हेच ब्रह्म आहे.

अयमात्मा ब्रह्म ।

संस्कृत श्लोक

अयमात्मा ब्रह्म ।

अर्थ (Meaning)

आत्मा हाच ब्रह्म आहे .

तत्वमसि ।

संस्कृत श्लोक

तत्वमसि ।

अर्थ (Meaning)

ते ब्रह्म तू आहेस.

अहं ब्रह्मास्मि ।

संस्कृत श्लोक

अहं ब्रह्मास्मि ।

अर्थ (Meaning)

मी ब्रह्म आहे.

समत्वं योग उच्यते ।

संस्कृत श्लोक

समत्वं योग उच्यते ।

श्रीभगवद्गीता ,अध्याय २, श्लोक ४८

अर्थ (Meaning)

समत्वालाच योग म्हटले जाते .

योगश्चितवृत्तिनिरोधः ।

संस्कृत श्लोक

योगश्चितवृत्तिनिरोधः ।

पातज्जलयोगदर्शन , समाधिपाद , सूत्र २

अर्थ (Meaning)

चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग .

पुनरपि जननं पुनरपि मरणं ।

संस्कृत श्लोक

पुनरपि जननं पुनरपि मरणं ।

चर्पटपञ्जरिकास्तोत्रम्, श्लोक २१

अर्थ (Meaning)

पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यु .

रसो वै सः।

संस्कृत श्लोक

रसो वै सः।

तेत्तिरीयउपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक७, वाक्य २

अर्थ (Meaning)

तो परमेश्वर रसरूप आहे .

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसम्पद : ।

संस्कृत श्लोक

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसम्पद:।

शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते ॥


अर्थ (Meaning)

सर्वांचे शुभ करणाऱ्या कल्याण करणाऱ्या आरोग्य व धनसंपदा देणाऱ्या हे दीपज्योती , वैरभावाचा नाश करण्यासाठी आम्ही तुला वंदन करतो.

ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

ऋचा

ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मा ऽ

मृतात्॥

ऋग्वेद , मण्डल ७ , सुक्त ५९ , ऋचा ९२

अर्थ (Meaning)

कीर्तीमन व महाशक्तिशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे ) आम्ही यजन करतो. हे रुद्रा काकडी देठापासुन खुडावी त्याप्रमाणे आम्हाला मृत्युपासुन मुक्त कर ; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको .

यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसारबंधनात् ।

संस्कृत श्लोक

यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसारबंधनात् ।

विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॥

विष्णुसहस्रनामस्तोत्र, प्रस्तावना, श्लोक ६

अर्थ (Meaning)

ज्यांच्या केवळ स्मरणानेच मनुष्य जन्म- मृत्यु आणि संसार बंधनातून मुक्त होतो ; त्या विविध अवतार घेणाऱ्या भगवान विष्णुला माझा नमस्कार असो .

या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक१६

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये निद्रारूपाने विराजमान आहे त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता ।


श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक ४५

अर्थ (Meaning)

लज्जारूपाने भगवतीच जीवात राहते.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

संस्कृत श्लोक

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

श्रीभगवद्गीता ,अध्याय २३, श्लोक २

अर्थ (Meaning)

आम्याला शस्त्रे कापू शकत नाहीत , विस्तव जाळू शकत नाही , पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.

आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।

संस्कृत श्लोक

आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।

धर्मो हि तेषामधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः॥

हितोपदेश ,श्लोक२५

अर्थ (Meaning)

आहार , निद्रा ,भय व मैथुन हे पशू आणि मानव यात समान आहेत ; यांच्यामध्ये धर्म केवळ विशेष आहे. धर्म असला , तरच तो मानव अन्यथा तो पशुतुल्य आहे.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।

संस्कृत श्लोक

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

अर्थ (Meaning)

लक्ष्मणा लंका सोन्याची जरी असली तरी मला तिच्याविषयी प्रेम नाही . आई आणि जन्मभुमी मला स्वर्गाहुनि थोर वाटतात .

नित्यनुतन: सनातनः ।

सुभाषित

नित्यनुतन: सनातनः ।

अर्थ (Meaning)

जे नित्य नुतन ते सनातन.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)