सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

संस्कृत श्लोक

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक २४

अर्थ (Meaning)

हे सर्वस्वरूपे, सर्वेश्वरी (सर्वांची स्वामिनी) आणि सर्व शक्तिशालिनी अशा दिव्यरूपिणी दुर्गे देवी, तू आमचे (दैत्यादी दुष्ट शक्तींच्या) भयांपासून रक्षण कर. तुला माझा नमस्कार असो.

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।

संस्कृत श्लोक

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।

सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक १२

अर्थ (Meaning)

शरण आलेल्या दीनजनांना तारण्यात सदैव तत्पर अशा, सर्वांचे दुःख दूर करणार्‍या हे देवी नारायणी (दुर्गादेवी) तुला माझा नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक २०

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धीरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक ७१

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये मातृरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक ३२

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक ३८

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये क्षमारूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता ।

संस्कृत श्लोक

या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ५, श्लोक ७४

अर्थ (Meaning)

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये भ्रान्तीरूपाने (भ्रमरूपाने) विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

संस्कृत श्लोक

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक १०

अर्थ (Meaning)

सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (श्री दुर्गादेवी), मी तुला नमस्कार करतो.

अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतम् ।

संस्कृत श्लोक

अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतम् ।

तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरि ।।

अर्थ (Meaning)

अजाणतेपण, विसरभोळेपणा अथवा बुद्धीभ्रष्टता यांमुळे तुझ्या पूजेत, ध्यानात, साधनेत, जप-तपांत मी जे काही न्यून-अधिक केले असेल त्याकरता हे देवी ! मला क्षमा कर आणि आमच्यावर प्रसन्न हो.

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।

संस्कृत श्लोक

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ।।

अर्थ (Meaning)

इंद्रादी देवताची शक्ती असणार्‍या, त्याचप्रमाणे महादेव, महाविष्णु, ब्रह्मदेवाची शक्ती असणार्‍या, मंगलरूप असणार्‍या, सुख देणार्‍या, मूळ प्रकृतिरूप असणार्‍या हे देवी, तुला आम्ही सर्व नम्र होऊन सतत नमस्कार करतो.

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

संस्कृत श्लोक

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।

अर्थ (Meaning)

वसुदेवपुत्र कृष्णाला, सर्व दुःखे हरण करणार्‍या परमात्म्याला आणि शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला माझा नमस्कार असो.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)