सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

संस्कृत श्लोक

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥


 

अर्थ (Meaning)

वळलेली सोंड, विशाल शरीर आणि कोटी सूर्यांचा प्रकाश असलेल्या हे (गणेश) देवा, माझी सर्व कार्ये नेहमी विघ्नरहीत कर.

अज्ञाननाशकं नारायणम् ।

स्तोत्र

अज्ञाननाशकं नारायणम् । शुद्ध विज्ञानभाशकं नारायणम् ।।


अर्थ (Meaning)

नारायण अज्ञानाचा नाश करणारा आणि शुद्ध विज्ञानाचा प्रकाशक आहे.

नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।

मंत्र

नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।

तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।।


अर्थ (Meaning)

आम्ही नारायणाला जाणतो. वासुदेवाचे ध्यान करतो. तो विष्णु आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

नारायणं भजे नारायणम् ।

स्तोत्र

नारायणं भजे नारायणम् । लक्ष्मीनारायणं भजे नारायणम् ।।


अर्थ (Meaning)

मी नारायणाची उपासना करतो. मी लक्ष्मीनारायणाची उपासना करतो.

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

संस्कृत श्लोक

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं       

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।।

अर्थ (Meaning)

ज्याची आकृती अतिशय शांत आहे, जो शेषनागावर पहुडला आहे, ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे, जो देवतांचाही ईश्वर असून संपूर्ण जगताला आधार आहे, जो आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे, ज्याचा वर्ण नीलमेघाप्रमाणे आहे, ज्याचे संपूर्ण शरीर अत्यंत सुंदर आहे, ज्याला योगी लोक ध्यान करून प्राप्त करतात, जो संपूर्ण विश्वाचा एकमेव स्वामी आहे, जो जन्म-मरणरूप भयाचा नाश करणारा आहे, अशा लक्ष्मीपती, कमलनेत्र भगवान विष्णूला मी वंदन करतो.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा

संस्कृत श्लोक

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।

करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।


श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय २, श्लोक ३६

अर्थ (Meaning)

हे नारायणा, शरीर, वाणी, मन, (अन्य) इंद्रिये, बुद्धी, आत्म्या यांनी अथवा प्रकृतिस्वभावानुसार जे जे मी करतो, ते ते तुम्हाला अर्पण करत आहे.

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।

संस्कृत श्लोक

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ।।


अर्थ (Meaning)

हे लक्ष्मीपते, तुझ्या चरणयुगलांचे स्मरण हेच लग्न, शुभ दिवस, नक्षत्रबल, चंद्रबल, विद्याबल आणि दैवबल असल्याने मी तुझ्या चरणांचेच स्मरण करतो.

ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् ।

संस्कृत श्लोक

ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् ।

अनेकरूप दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् ।।


विष्णुसहस्रनामस्तोत्र, प्रस्तावना, श्लोक २२

अर्थ (Meaning)

अजेय, महाविष्णु, सर्वांचे स्वामी, महेश्वर, ज्यांची अनेक रूपे आहेत, असुरांचा संहारक अशा पुरुषोत्तम श्रीविष्णूंना मी वंदन करतो.

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।

संस्कृत श्लोक

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।

विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।

विष्णुसहस्रनामस्तोत्र, प्रस्तावना, श्लोक ६

अर्थ (Meaning)

ज्याच्या केवळ स्मरणानेच मनुष्य जन्म-मृत्यू आणि संसारबंधनातून मुक्त होतो, त्या विविध अवतार घेणार्‍या भगवान विष्णूला माझा नमस्कार असो.

अच्युतं केशवं रामनारायणं

संस्कृत श्लोक

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे ।।

अच्युताष्टकम्, श्लोक १

अर्थ (Meaning)

अच्युत, केशव, रामनारायण, कृष्ण, दामोदर, वासुदेव, हरि, श्रीधर, माधव, गोपिकावल्लभ, जानकीनायक ही नावे असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांना मी हृदयपूर्वक भजत आहे.

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।

मराठी श्लोक

नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।

पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ।।

अर्थ (Meaning)

शिवाची महती आणि त्याचे नामस्मरण हाच सर्वांचा जिव्हाळा आहे. त्यामुळे हे मना, तू शिवमंत्राची माळ जप आणि पंचाक्षरी मंत्राचे (ॐ नमः शिवाय ।) ध्यान कर. हे भगवान शंकरा, तुझ्यावाचून माझे कोण रक्षण करेल ?

कैलासराणा शिव चंद्रमौळी

मराठी श्लोक

कैलासराणा शिव चंद्रमौळी

फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।

कारुण्यसिंधू भवदुःखहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ।।

अर्थ (Meaning)

जो कैलास पर्वतावर विराजमान झाला आहे, ज्याच्या मस्तकावर चंद्र आणि सर्प आहे, जो करुणेचा सागर आहे आणि भवदुःखाचे हरण करणारा आहे; अशा हे भगवान शंकरा, तुझ्यावाचून माझे कोण रक्षण करेल ?

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।

संस्कृत श्लोक

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।

सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।

अर्थ (Meaning)

कापूराप्रमाणे गोरा असणार्‍या, करूण रसाचा अवतार असणार्‍या, त्रैलोक्याचे सार असणार्‍या ज्याने नागराजाला आपला कंठहार केला आहे, जो सर्वकाळ हृदयकमलामध्ये निरंतर वास करतो, अशा पार्वतीसहीत असणार्‍या शंकराला, मी नमस्कार करतो.

नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गास्वरूपिणि ।

संस्कृत श्लोक

नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गास्वरूपिणि ।

कैवल्यवासिनि देवि श्री शान्तादुर्गे नमोऽस्तु ते ।।

अर्थ (Meaning)

हे दुर्गे, महादुर्गे,नवदुर्गास्वरूप देवी तुला नमस्कार असो. आत्मस्वरूपात स्थित असणार्‍या हे श्री शान्तादुर्गे, तुला माझा नमस्कार असो.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

संस्कृत श्लोक

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।

अर्थ (Meaning)

जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्रवस्त्र धारण केले आहे; जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत; जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः

संस्कृत श्लोक

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः

स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।

दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या

सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ।।

अर्थ (Meaning)

हे दुर्गादेवी, जो तुझे भक्तीपूर्वक स्मरण करेल त्याचे संसारभय तू दूर करतेस. जो तुझे ध्यान करतो त्याला तू कल्याणकारक बुद्धी प्रदान करतेस. आमच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि भय दूर करणार्‍या हे देवी, तुझ्याशिवाय असे कोण आहे, ज्याचे हृदय आपल्या भक्तांवर सर्व प्रकारचे उपकार करण्यासाठी नेहमी दयार्द्र असते ?

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।

संस्कृत श्लोक

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।

एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक ३९

अर्थ (Meaning)

हे सर्वेश्वरी, अशा प्रकारे तू तिन्ही लोकांच्या सर्व बाधांचे शमन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश कर.

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।

संस्कृत श्लोक

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ।। 

अर्थ (Meaning)

जयन्ती (विजय प्राप्त करणारी), मंगला (कल्याण करणारी), कालीमाता, भद्रकाली, कपालिनी (कवट्यांची माळ धारण करणारी), दुर्गा, क्षमा (क्षमेची मूर्ती), शिवा (पवित्र), धात्री (सर्वांना धारण करणारी किंवा आधार देणारी), स्वाहा (देवांना दिली जाणारी आहुती) आणि स्वधा (पितरांना दिली जाणारी आहुती) या नावांनी प्रसिद्ध असणार्‍या हे जगदंबे, तुला माझा नमस्कार असो.

सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वित: ।

संस्कृत श्लोक

सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वित: ।

मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय: ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय १२, श्लोक १३

अर्थ (Meaning)

माझ्या कृपाप्रसादाने मनुष्य सर्व बाधांपासून मुक्त होईल आणि त्याला धन, धान्य, संतती प्राप्त होईल यात संशय नाही.

रोगनशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान्सकलानभीष्टान् ।

संस्कृत श्लोक

रोगनशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान्सकलानभीष्टान् ।

त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वमाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ।।

श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक २९

अर्थ (Meaning)

हे देवी, तू प्रसन्न झाली असता सर्व रोगांना समूळ नष्ट करतेस. तू रागावली असता एकही मनोकामना पूर्ण होऊ शकत नाही. जे तुझा आश्रय घेतात त्यांच्यावर कधीही कोणतीही आपत्ती येत नाही. असे लोक तुझ्या कृपेमुळे अन्य लोकांनाही आश्रय आणि अभय देऊ शकतात.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)