सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

अतसीपुष्पसङ्का‌शां रत्नभूषणभूषिताम्।

संस्कृत श्लोक

अतसीपुष्पसङ्का‌शां रत्नभूषणभूषिताम्।

शङ्खचक्रगदापद्मशार्ङ्गबाणधरां करैः ।।

षड्भिः कराभ्यां देवेशीं वरदाभयशोभिताम्।

एवमष्टभुजां ध्यायेत्‌ सर्वसाम्राज्यसिद्धये ॥

–इतर  •  इतर

अर्थ (Meaning)

अर्थ : अळशीच्या फुलांप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या, रत्नजडीत अलंकारांनी सुशोभित, सहा हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य आणि बाण धारण केलेल्या हे देवी, तू वर देणाऱ्या अन्‌ अभय देणाऱ्या मुद्रांनी शोभून दिसतेस. सर्व साम्राज्याच्या प्राप्तीसाठी हे अष्टभुजा, मी तुझे पूजन करतो.

अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये

स्तोत्र

अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये

गुणगणवारिधि लोकहितैषिणि स्वरसप्तभूषित गाननुते ।

सकलसुरासुरदेवमुनीश्वर मानववन्दितपादयुते

जयजय हे मधुसूदनकामिनि सन्तानलक्ष्मि त्वं पालय माम् ।।


अर्थ (Meaning)

सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) जिचे वाहन आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारे जिचा महिमा अधिकच वाढतो, जी विविध गुणांचा सागर आहे, जी सर्वसामान्य जनांचे हित करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य जिची पूजा करतात, अशा भगवान मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय असो. तू माझे रक्षण कर.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

संस्कृत श्लोक

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।

अर्थ (Meaning)

जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्रवस्त्र धारण केले आहे; जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत; जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)