सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं

संस्कृत श्लोक

गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं

बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् ।

अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं

पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि ।।


अर्थ (Meaning)

हत्तीप्रमाणे मुख असणार्‍या, कल्पनातीत, तीक्ष्ण दात असलेला, तीन नेत्र असलेला, विशाल उदर असलेला, अशेष (ज्याला अंत नाही, पूर्णत्व असलेला), धनाचा राजा, अतिशय पुरातन, देवतांना पूजनीय, लाल वर्ण असणारा, देवांचाही देव, साक्षात् देवाधिदेव महादेवांचा पुत्र, विघ्नांचा स्वामी असलेल्या गजाननाला मी वंदन करतो.

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

संस्कृत श्लोक

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।

द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।

सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।


अर्थ (Meaning)

सुंदर मुख असलेला (सुमुख), एक दात असलेला (एकदन्त), फिक्कट करडा रंग असलेला (कपिल), हत्तीप्रमाणे कान असलेला (गजकर्णक), विशाल पोट असलेला (लंबोदर), (दुर्जनांच्या नाशासाठी) विक्राळ रूप असलेला (विकट), संकटांचा नाश करणारा (विघ्ननाश), गणांचा नायक (विनायक), धुरकट रंगाचा (धूम्रकेतू), गणांचा प्रमुख (गणाध्यक्ष), मस्तकावर चंद्र धारण करणारा (भालचंद्र) आणि हत्तीप्रमाणे तोंड असलेला (गजानन) - या श्री गणपतीच्या बारा नावांचे विवाहाच्या वेळी, विद्याभ्यास चालू करतांना, (घरात) प्रवेश करतांना अथवा (घरातून) बाहेर पडतांना, युद्धावर जातांना आणि संकटकाळी जो पठण करील किंवा ऐकेल त्याला कोणतेही विघ्न येणार नाही.

गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् ।

संस्कृत श्लोक

गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् ।

उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ।।


अर्थ (Meaning)

ज्याचे मुख हत्तीप्रमाणे आहे, भूतगण इत्यादी ज्याची सेवा करतात, जो कवठ आणि जांभूळ या फळांचे सार (गर) भक्षण करतो, उमेचा पुत्र, शोकाचा विनाश करणारा, विघ्नांचा स्वामी असलेल्या श्रीगणेशाच्या चरणकमलांना मी वंदन करतो.

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे

मंत्र

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।।


ऋग्वेद, मण्डल २, सूक्त २३, ऋचा १

अर्थ (Meaning)

हे ब्रह्मणस्पति, तू देवांमध्ये गणपति आणि कवींमध्ये कवी आहेस. तुझे अन्न सर्वोच्च अन् उपमानभूत (इतरांना उपमा ठरलेले) आहे. तू प्रशंसनीय लोकांमध्ये राजा असून मंत्रांचा अधिपती आहेस. आम्ही तुझ्या आगमनाची इच्छा करतो. तुझ्याविषयीची आमची ही स्तुती ऐकून आश्रय देण्यासाठी या यज्ञामध्ये तुझे अस्तित्व निर्माण कर.

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

संस्कृत श्लोक

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥


 

अर्थ (Meaning)

वळलेली सोंड, विशाल शरीर आणि कोटी सूर्यांचा प्रकाश असलेल्या हे (गणेश) देवा, माझी सर्व कार्ये नेहमी विघ्नरहीत कर.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)