सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

अति सर्वत्र वर्जयेत् ।

सुभाषित

अति सर्वत्र वर्जयेत् ।

अर्थ (Meaning)

सर्व गोष्टी अति करणे टाळावे.

मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्।

संस्कृत श्लोक

मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्।

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥

अर्थ (Meaning)

ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलंडण्यास समर्थ बनवते , त्या परमानंदस्वरूप माधवाला मी नमस्कार करतो.

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।

संस्कृत श्लोक

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।

देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥

अर्थ (Meaning)

वसुदेवाचा पुत्र; तसेच कंस , चाणूर इत्यादीचा निःपात करणा ऱ्या देवकीला परमानंद देणाऱ्या व संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणाऱ्या श्रीकृष्णाला नमस्कार करतो.

प्रणतक्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः ।

संस्कृत श्लोक

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॥

अर्थ (Meaning)

वसुदेव पुत्र कृष्णाला सर्व दुःखे हरण करणाऱ्या परमात्म्याला व शरणागतांचे क्लेश दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार असो.

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

संस्कृत श्लोक

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥

अर्थ (Meaning)

पूर्ण फुललेल्या कमळाच्या पाकलीसारखे टपोरे डोळे असलेले विशाल बुद्धीचे व्यास ज्यांनी महाभारतरूपी तेलाने पूर्ण असा ज्ञानमय दीप प्रज्वलित केला ,त्या तुम्हाला नमस्कार असो

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।

सुभाषित

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।

अर्थ (Meaning)

जगात अध्यात्म आणि तत्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते , लिहिले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते . दुसरा अर्थः- या जगातील सर्व ज्ञान व्यासांनी चाखलेले आहे.

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।

संस्कृत श्लोक

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः॥

अर्थ (Meaning)

गुरु हेच ब्रह्मा , गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे; तर ते साक्षात् परब्रह्म ईश्वराचा ईश्वर ) आहेत . अशा गुरूंना मी नमस्कार करतो .

न भूतो न भविष्यति ।

सुभाषित

न भूतो न भविष्यति।

अर्थ (Meaning)

जे पूर्वी कधीही झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही.

वितृणां लोकमपि गच्छन्तु ये मृताः ।

ऋचा

वितृणां लोकमपि गच्छन्तु ये मृताः ।

अथर्ववेद,कांड१२, सूक्त २ , मंत्र ४५

अर्थ (Meaning)

जे मृत आहेत, ते पितृलोकात जावोत .

ब्राह्मणस्त्वन धीयानस्तृणाग्निरिव शाम्यति ।

संस्कृत श्लोक

ब्राह्मणस्त्वन धीयानस्तृणाग्निरिव शाम्यति ।

तस्मै हव्यं न दातव्यं नहि भस्मनि हूयते ॥

मनुस्मृती, अध्याय ३ , श्लोक १६८

अर्थ (Meaning)

वेदांचे अध्ययन न केलेल्या ब्राह्मणाचा अग्नी ( तेज) गवतांच्या आगीप्रमाणे लगेच शांत होतो. त्यामुळे अशा ब्राह्मणाला हव्यदान देऊ नये; कारण राखेत कोणी आहुती देत नाही

भस्मीभूतेषु विप्रेषु मोहात् दत्तानि दातृभिः

संस्कृत श्लोक

नश्यन्ति हव्यकाव्यानि नराणाम् अविजानताम् ।

भस्मीभूतेषु विप्रेषु मोहात् दत्तानि दातृभिः॥ अध्याय ३, श्लोक ९७

मनुस्मृती

अर्थ (Meaning)

अपात्र अशा ' भस्मीभूत'ब्राह्मणाला अविवेकाने दानदिलेली हव्ये ( देवासांठीच्या आहुती ) आणि कव्ये( पितरांसाठीच्याआहुती)नष्ट होतात.

नश्यन्ति हव्यकाव्यानि नराणाम् अविजानताम् ।

संस्कृत श्लोक

नश्यन्ति हव्यकाव्यानि नराणाम् अविजानताम् ।

भस्मीभूतेषु विप्रेषु मोहात् दत्तानि दातृभिः॥

मनुस्मृती,अध्याय ३, श्लोक ९७

अर्थ (Meaning)

अपात्र अशा ' भस्मीभूत'ब्राह्मणाला अविवेकाने दानदिलेली हव्ये ( देवासांठीच्या आहुती ) आणि कव्ये( पितरांसाठीच्याआहुती)नष्ट होतात.

पित्र्ये रात्र्यहनी मासः प्रविभागस्तु पक्षयोः ।

संस्कृत श्लोक

पित्र्ये रात्र्यहनी मासः प्रविभागस्तु पक्षयोः।

कर्मचेष्टास्वह: कृष्ण : शुक्ल: स्वप्नाय शर्वरी॥

मनुस्मृती,अध्याय १ , श्लोक ६६

अर्थ (Meaning)

अमावस्येला चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असतात. सूर्य त्या वेळी चंद्राच्या अगदी वर असतो. त्या वेळी पितरांचे मध्यान्ह असते.

विधूर्ध्वभागे पितरो वसन्तः स्वाधः सुधादीधितिमामनन्ति।

संस्कृत श्लोक

विधूर्ध्वभागे पितरो वसन्तः स्वाधः सुधादीधितिमामनन्ति।

पश्यन्ति तेऽर्कं निजमस्तर्कोर्ध्व दर्शे यतो ऽस्माद्युदलं तदैषाम्॥

सिद्धान्त शिरोमणि , गोलाध्याय, त्रिप्रश्नवासना , श्लोक १३

अर्थ (Meaning)

चंद्राच्या पृष्ठभागावर पितरांचा निवास असतो. पितरांच्या खालच्या बाजुला चंद्राचे तेज असते. अमावस्येला( चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो.त्या वेळी) पितरांच्या बरोबर डोक्यावर चंद्र आलेला असतो; म्हणून अमावस्या ही पितरांची मध्यान्ह , म्हणजे दुपार असते.( पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी असते त्यामुळे चंद्रलोकामध्ये मध्यरात्र असते .)

सत्यं शिवं सुन्दरम् ।

सुभाषित

सत्यं शिवं सुन्दरम् ।

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

श्रध्दावान् लभते ज्ञानम् ।

सुभाषित

श्रध्दावान् लभते ज्ञानम् ।

अर्थ (Meaning)

श्रद्धा असलेल्याच व्यक्तीला ज्ञान मिळते ; असे म्हटले आहे.

शरीरमादयं खलु धर्मसाधनम् ।

सुभाषित

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम् ।

अर्थ (Meaning)

'धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे' म्हणजेच साधनेसाठी शरीर चांगले असणे उपयोगाचे आहे, असे वचन आहे . हे लक्षात असु दया.

केला जरी पोत बळेची खाले |

उक्ती

केला जरी पोत बळेची खाले |ज्वाला तरी ते वरती उफाळे ||

अर्थ (Meaning)

जरी बळाने मशालीचा पोत खाली केला ,तरी त्याची ज्वाळा वरच येते .

जो दुसऱ्यावरी विश्वासला |

ओवी

जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला |

जो आपणचि कष्टत गेला | तोचि भला ||

–समर्थ रामदास स्वामी  •  दासबोध, दशक १९ ,समास ९ ,ओवी १६

अर्थ (Meaning)

जो दुसऱ्यांवर जास्त विश्वास टाकतो ,त्याचा कार्यभाग बुडतो . जो स्वतः कष्ट करतो तोच भला होय .

हेचि आम्हा करणे काम |बीज वाढवावे नाम

अभंग

धर्माचे पाळण |करणे पाखांड खंडन ||१||

हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम ||धृ||


तीक्षण उत्तरे | हाती घेउनि बाण फिरे ||२ ||

हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम ||धृ||


नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||३ ||

हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम ||धृ||



–संत तुकाराम महाराज  •  तुकारामगाथा ,अभंग २१२५

अर्थ (Meaning)

सर्व पाखंड मतांचे खंडण करून वेदप्रतिपादित धर्म रक्षण करावा . तो असा की सर्व धर्माचे बीज जे भगवंताचे नाम ते वाढवावे . त्याचा सर्वत्र प्रसार करावा ,हेच आमचे काम आहे . यासाठी कठोर शब्दरूपी बाण हातात घेऊन आम्ही फिरत असतो [कठोर शब्दांनी उपदेश करतो .]तुकाराम महाराज म्हणतात ;हे काम करण्यास आम्हाला लहान अथवा थोर याची भीड नाही .

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)