सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।

संस्कृत श्लोक

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनं ।।


अर्थ (Meaning)

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर हाताचे दर्शन घ्यावे.

त्वमेव माता च पिता त्वमेव ।

संस्कृत श्लोक

त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।। १४ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

हे गुरुदेवा, तूच माझी माता, पिता, बंधू, सखा, विद्या, धन, देव आणि सर्वस्व आहेस.

गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।

संस्कृत श्लोक

गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।

गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।। १३ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

गुरु आदी म्हणजे प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे; पण गुरूंना स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत आहे. गुरुंहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.

मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।

संस्कृत श्लोक

मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।

मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ।। १२ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

माझे स्वामी संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, माझे गुरु संपूर्ण ब्रह्मांडाचे गुरु आहेत, माझा आत्मा सर्वव्यापी म्हणजेच सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा अनुभव देणार्‍या श्रीगुरुंना नमस्कार असो.

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।

संस्कृत श्लोक

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।

तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।। ११ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

श्रीगुरुंपेक्षा अधिक कोणतेही तत्त्व नाही, श्रीगुरुंपेक्षा मोठे कोणतेही तप नाही, श्रीगुरुंच्या सान्निध्यात मिळणार्‍या ज्ञानापेक्षा अधिक कोणतेही तत्त्वज्ञान नाही, अशा श्रीगुरुंना नमस्कार असो.

शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।

संस्कृत श्लोक

शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।

गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः ।। १० ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

जे आपल्या चरणतीर्थाने (शिष्याच्या जीवनातील) संसाररूपी महासागराला सुकवून (त्यातील दुःख/आवड शोषून/नष्ट करून) आवश्यक अशा धनाकडे (आध्यात्मिक ज्ञानाकडे) घेऊन जातात, अशा श्रीगुरुंना नमस्कार असो.

अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।

संस्कृत श्लोक

अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।

आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः ।। ९ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

आत्मज्ञान प्रदान करून अनेक जन्मांच्या संचित कर्मांचे बंध जाळून नष्ट करणार्‍या श्रीगुरुंना नमस्कार असो.

ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।

संस्कृत श्लोक

ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।

भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः ।। ८ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

ज्ञान आणि शक्ती या दोन्हींवर समान प्रभुत्व असणार्‍या, तत्त्वरूपी माळेने सुशोभित असणार्‍या, सांसारिक समृद्धी आणि मुक्ती अशा दोन्हीही गोष्टी प्रदान करणार्‍या श्रीगुरुंना नमस्कार असो.

चैतन्यः शाश्वतः शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।

संस्कृत श्लोक

चैतन्यः शाश्वतः शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।

बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः ।। ७ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

चैतन्यमय, शाश्वत, शांत, आकाशाच्याही पलीकडे, निरंजन, बिंदू-नाद-कला यांच्या पलीकडे असणार्‍या श्रीगुरुंना नमस्कार असो.

सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।

संस्कृत श्लोक

सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।

वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः ।। ६ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

ज्यांचे चरणकमल सर्व वेदांच्या मुकुटमणीरूप श्रृतींनी (महावाक्यांनी) सुशोभित आहे, जे वेदांतरूपी कमळाला विकसित करणारा जणू सूर्यच आहेत, अशा श्रीगुरूंना नमस्कार असो.

चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।

संस्कृत श्लोक

चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। ५ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

ज्यांचे चैतन्यमय स्वरूप तिन्ही लोकांमधील सर्व चर आणि अचर गोष्टींना व्यापून राहिले आहेत, त्या ब्रह्मपद दाखवणार्‍या श्रीगुरूंना मी नमस्कार करतो.

स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।

संस्कृत श्लोक

स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। ४ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

पर्वतादि स्थावर आणि पशुपक्षीमानवादि स्थलांतर करणारे, तसेच चर आणि अचर, सजीव-निर्जीव असे सर्व जग ज्यांनी व्यापले आहे, त्या ब्रह्मपद दाखवणार्‍या श्रीगुरूंना मी नमस्कार करतो.

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।

संस्कृत श्लोक

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।

चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। २ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षू उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधि दाखविला, त्या श्रीगुरुंना नमस्कार असो.

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।

संस्कृत श्लोक

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। १ ।।


श्रीगुरुस्तोत्रम्

अर्थ (Meaning)

ज्याने हे चराचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ (ब्रह्मांड) व्यापले आहे, त्या ब्रह्मपद दाखवणार्‍या श्रीगुरूंना मी नमस्कार करतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: ।

संस्कृत श्लोक

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ।।


अर्थ (Meaning)

गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं

संस्कृत श्लोक

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं  

द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं

भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।


अर्थ (Meaning)

ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वन्द्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे लक्ष्य (ते तू आहेस असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो.

गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं

संस्कृत श्लोक

गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं

बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् ।

अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं

पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि ।।


अर्थ (Meaning)

हत्तीप्रमाणे मुख असणार्‍या, कल्पनातीत, तीक्ष्ण दात असलेला, तीन नेत्र असलेला, विशाल उदर असलेला, अशेष (ज्याला अंत नाही, पूर्णत्व असलेला), धनाचा राजा, अतिशय पुरातन, देवतांना पूजनीय, लाल वर्ण असणारा, देवांचाही देव, साक्षात् देवाधिदेव महादेवांचा पुत्र, विघ्नांचा स्वामी असलेल्या गजाननाला मी वंदन करतो.

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

संस्कृत श्लोक

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।

द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।

सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।


अर्थ (Meaning)

सुंदर मुख असलेला (सुमुख), एक दात असलेला (एकदन्त), फिक्कट करडा रंग असलेला (कपिल), हत्तीप्रमाणे कान असलेला (गजकर्णक), विशाल पोट असलेला (लंबोदर), (दुर्जनांच्या नाशासाठी) विक्राळ रूप असलेला (विकट), संकटांचा नाश करणारा (विघ्ननाश), गणांचा नायक (विनायक), धुरकट रंगाचा (धूम्रकेतू), गणांचा प्रमुख (गणाध्यक्ष), मस्तकावर चंद्र धारण करणारा (भालचंद्र) आणि हत्तीप्रमाणे तोंड असलेला (गजानन) - या श्री गणपतीच्या बारा नावांचे विवाहाच्या वेळी, विद्याभ्यास चालू करतांना, (घरात) प्रवेश करतांना अथवा (घरातून) बाहेर पडतांना, युद्धावर जातांना आणि संकटकाळी जो पठण करील किंवा ऐकेल त्याला कोणतेही विघ्न येणार नाही.

गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् ।

संस्कृत श्लोक

गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् ।

उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ।।


अर्थ (Meaning)

ज्याचे मुख हत्तीप्रमाणे आहे, भूतगण इत्यादी ज्याची सेवा करतात, जो कवठ आणि जांभूळ या फळांचे सार (गर) भक्षण करतो, उमेचा पुत्र, शोकाचा विनाश करणारा, विघ्नांचा स्वामी असलेल्या श्रीगणेशाच्या चरणकमलांना मी वंदन करतो.

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे

मंत्र

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।।


ऋग्वेद, मण्डल २, सूक्त २३, ऋचा १

अर्थ (Meaning)

हे ब्रह्मणस्पति, तू देवांमध्ये गणपति आणि कवींमध्ये कवी आहेस. तुझे अन्न सर्वोच्च अन् उपमानभूत (इतरांना उपमा ठरलेले) आहे. तू प्रशंसनीय लोकांमध्ये राजा असून मंत्रांचा अधिपती आहेस. आम्ही तुझ्या आगमनाची इच्छा करतो. तुझ्याविषयीची आमची ही स्तुती ऐकून आश्रय देण्यासाठी या यज्ञामध्ये तुझे अस्तित्व निर्माण कर.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)