सनातन भाषासंपदा

संदर्भ वाङ्मय

धर्माचे पाळण |

अभंग

धर्माचे पाळण|करणे पाखांड खंडन ||१||

हेचि आम्हा करणे काम |बीज वाढवावे नाम ||धृ||


तीक्षण उत्तरे |हाती घेउनि बाण फिरे ||२ ||


नाही भीड भार |तुका म्हणे साना थोर ||३ ||

–संत तुकाराम महाराज  •  तुकाराम गाथाअभंग २१२५

अर्थ (Meaning)

सर्व पाखंड मतांचे खंडण करून वेदप्रतिपादित धर्म रक्षण करावा . तो असा की सर्व धर्माचे बीज जे भगवंताचे नाम ते वाढवावे . त्याचा सर्वत्र प्रसार करावा ,हेच आमचे काम आहे . यासाठी कठोर शब्दरूपी बाण हातात घेऊन आम्ही फिरत असतो [कठोर शब्दांनी उपदेश करतो .]तुकाराम महाराज म्हणतात ;हे काम करण्यास आम्हाला लहान अथवा थोर याची भीड नाही .

हे मजचि स्तव जाहले |

ओवी

हे मजचि स्तव जाहले | परि म्या नाही केले |

ऐसे जेणे जाणिले | तो सुटला गा ||

–संत ज्ञानेश्वर महाराज  •  ज्ञानेश्वरी अध्याय ४ ,ओवी ८१

अर्थ (Meaning)

हा वर्णभेद जरी माझ्यापासून झाला आहे ,तरी तो मी केला नाही असे जो जाणतो;तोच कर्मतीत झाला . हे माझ्यामुळे झाले ;पण मी केले नाही . हे ज्याने ओळखले तो जन्म -मृत्यू च्या चक्रातून सुटला .

ठेविले अनंते तैसेचि राहावे |

अभंग

ठेविले अनंते तैसेचि राहावे |चित्ती असो द्यावे समाधान ||

–संत तुकाराम महाराज  •  तुकाराम गाथा अभंग २८६७ ,ओवी २

अर्थ (Meaning)

भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले ,त्या स्थितीत रहावे . चित्ती मात्र समाधान असावे.

शहाणे करुनी सोडावे | बहुत जन

ओवी

जितुके काही आपणासी ठावे |तितुके हळूहळू सिकवावे |

शाहणे करुनी सोडावे |बहुत जन ||


दासबोध दशक १९ ,समास १० ,ओवी १४

अर्थ (Meaning)

आपल्याला जे ठाऊक असते ,ते हळूहळू इतरांना शिकवावे. अश्या प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे .

जितुके काही आपणासी ठावे |

ओवी

जितुके काही आपणासी ठावे |तितुके हळूहळू सिकवावे |

शाहणे करुनी सोडावे |बहुत जन ||दशक १९ ,समास १० ,ओवी १४


दासबोध दशक १९ ,समास १० ,ओवी १४

अर्थ (Meaning)

आपल्याला जे ठाऊक असते ,ते हळूहळू इतरांना शिकवावे. अश्या प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे .

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |

मराठी श्लोक

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते नाम घेता फुकाचे |

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म |

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

की घेतले व्रत न आम्ही अंधतेने |

कविता

की घेतले व्रत न आम्ही अंधतेने |

लब्ध -प्रकाश -इतिहास -निसर्गमाने |

जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे |

बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे ||

–स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

'याचे देही याची डोळा '

वाक्प्रचार

याचे देही याची डोळा '

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |

मराठी श्लोक

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे |

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी

तेथे तुझे सद्गुरू पाय दोह्नी ||

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

सर्वही तीर्थे घडली देवा | सदगुरुचरणासी ||

भजन

सर्वही तीर्थे घडली देवा | सदगुरुचरणासी ||

भजनामृत

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

ॐ नमोजी आद्या |

ओवी

ॐ नमोजी आद्या |वेदप्रतिपाद्या |जयजय स्वसंवेद्या |आत्मरूपा ||अध्याय १ ,ओवी १

–संत ज्ञानेश्वर महाराज  •  ज्ञानेश्वरी

अर्थ (Meaning)

'ॐ हे आदिशक्तीचे प्रथम स्वरूप असून ते वेदांनी प्रतिपादन केले आहे . तेच स्वसंवेद्य अशा आत्मस्वरूपाने सर्वत्र कार्य करत आहे ,अश्या ॐ काररूपी [श्रीकृषणरूपी ]आदिशक्तीला नमस्कार असो. '

पंढरीसी नाही कोणा अभिमान |

अभंग

पंढरीसी नाही कोणा अभिमान | पाया पडे जन एकामेका|| ओवी २,अभंग २४८०

–संत तुकाराम महाराज  •  तुकाराम गाथा

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

नम्र जाला भूतां|

अभंग

नम्र जाला भूतां| तेणे कोंडिले अनंता ||ओवी १,अभंग १४७५

–संत तुकाराम महाराज  •  तुकाराम गाथा

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

'आदिशक्ती तु अंतशक्ती तू '

मराठी श्लोक

'आदिशक्ती तू अंतशक्ती तू जगजननी तू लयकारी तू ||'

अर्थ (Meaning)

अर्थ : उपलब्ध नाही

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।

सुभाषित

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।

अर्थ (Meaning)

‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’ म्हणजेच साधनेसाठी शरीर चांगले असणे उपयोगाचे आहे, असे वचन आहे. हे लक्षात असू द्या.

आदिशक्तिर्महामाया सच्चिदानन्दरूपिणी ।

संस्कृत श्लोक

आदिशक्तिर्महामाया सच्चिदानन्दरूपिणी ।

पालनार्थं स्वभक्तानां शान्तादुर्गाभिधा मता ।।


अर्थ (Meaning)

आदिशक्ती महामाया, सच्चिदानंदस्वरूप अशी देवी आपल्या भक्तांचे पालन करण्यासाठी शांतादुर्गा या नावाने ओळखली जाते.

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।

संस्कृत श्लोक

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।

दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।।


अर्थ (Meaning)

दीपज्योती ही परब्रह्मस्वरूप असून जणु जनार्दनाचे रूप आहे. दिवा माझे पाप दूर करो. हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

ॐ असतो मा सद्गमय ।

मंत्र

ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय ।


ॐ शान्ति शान्ति शान्ति: ।।


बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय १, ब्राह्मण ३, वाक्य २८

अर्थ (Meaning)

हे परमेश्वरा ! मला असत्याकडून सत्याकडे ने, मला अंधारातून प्रकाशाकडे ने, मला मृत्यूपासून अमृतत्त्वाकडे ने.

सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।

संस्कृत श्लोक

सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।।


अर्थ (Meaning)

सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।

संस्कृत श्लोक

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।


अर्थ (Meaning)

समुद्ररूपी वस्त्र धारण करणार्‍या, पर्वतरूपी स्तन असणार्‍या अन् भगवान श्रीविष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, मी तुला नमस्कार करतो. तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे, यासाठी तू मला क्षमा कर.

संस्कृत आणि मराठी पडताळण्यासाठी लिंक्स

1 सत्संगधारा satsangdhara.net यावर सहा दर्शने, चार वेद, प्रमुख उपनिषदे, प्रमुख पुराणे, रामायण, काही स्तोत्रे, संतसाहित्य जसे ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अर्थासह आहेत. 2 Sanskrit Documents sanskritdocuments.org स्तोत्रवाङ्मय, रामायण, महाभारत, अमरकोष, नाट्यशास्त्र आदी ग्रंथ 3 संस्कृत विकिस्रोत sa.wikisource.org वेद, रामायण, स्मृतिग्रंथ आदी संस्कृत साहित्य 4 मराठी विकिस्रोत mr.wikisource.org अभंग, कविता, ओव्या, स्तोत्रे आदी मराठी साहित्य 5 Transliteral transliteral.org यात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चार भाषांमधील साहित्य आहे. अ. मराठी - भूपाळी, ओव्या, आरत्या, अभंग, श्री गजानन विजय, अधिकमास माहात्म्य पोथी, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ. आ. संस्कृत - अमरकोष, धर्मसिंधु आदी प्रमुख ग्रंथ इ. हिंदी - आरती, चालिसा, गीते, कविता 6 संत साहित्य santsahitya.in सर्व संतांची माहिती आणि त्यांचे साहित्य, अर्थासहित अभंग 7 आठवणीतली गाणी aathavanitli-gani.com मराठी गीते, कविता
शोधत आहे... (Searching...)